मुळा नदीत दुषित व केमिकल मिश्रीत पाण्यामुळे मृत माशांचा खच

पिंपरी प्रतिनिधी: पिंपळे निलख स्मशानभूमी येथून वाहणाऱ्या   मुळा नदीपात्रात दुषित व केमिकल मिश्रीत पाण्यामुळे मृत माशांचा खच पडला आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फक्त तोडदेखली कारवाई केली जाते.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांचेकडून चाकण येथील मर्चडीज बेंझ कंपनीस अचानक भेट दिली जाते.

आपले हितसंबंध जोपासून सोशल मिडियावर टाकलेली पोस्ट डिलीट केली जाते परंतु या जलचर प्राण्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या कंपन्यांकडून केमिकल मिश्रीत पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई  करण्यास वेळ नाही.पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभागाने देखिल फक्त बघ्याची भुमिका घेतली आहे. पिंपळे निलख येथिल नागरिकांनी आम आदमी पार्टीचे नेते रविराज काळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर संबंधित ठिकाणी पाहणी केल्यानंतर संबंधित प्रकार पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांना हाॅट्सअप फोटो पाठवण्यात आले.असे आपचे रविराज काळे यांनी सांगितले

See also  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते चिवरदान व धम्मदान अर्पण