बालेवाडी येथे सुरक्षारक्षकांवर हल्ला; दोघांवर पोलिसांची तत्काळ कारवाई

बाणेर : बालेवाडी येथे संस्कृती होम्स सोसायटीच्या आवारात डिलिव्हरी कर्मचाऱ्यांकडून सुरक्षारक्षकावर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी (दि.२९) रोजी दुपारी २:३०च्या सुमारास घडली.याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.


महेश गायकवाड (वय २२) व अभिषेक महादेव सुतार (वय
२२, दोघे रा. बालेवाडी) हे डिलिव्हरी एजंट पार्सल पोहोचवण्यासाठी बालेवाडी येथील संस्कृती होम्स सोसायटीत आले. यावेळी ड्युटीवरील सुरक्षारक्षकांनी त्याला डिलिव्हर पार्सल स्वीकारण्यास परवानगी नाही, असे सांगितले. तेव्हा तो आक्रमक झाला आणि त्याने एका रक्षकाचा मोबाईल फोन फेकून दिला,
ज्यामुळे तो फुटला. यानंतर महेशने सुरक्षारक्षकाला तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली. 15 ते 20 जणांच्या टोळक्याने सुरक्षारक्षकांना मारहाण केली.  मारहाणीमध्ये मिथिलेस मिश्रा व अनेक मिश्रा या रक्षकाच्या दोन्ही हातांना व डोक्याला दुखापत झाली. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले.


याघटनेमुळे सोसायटीत भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर गोरक्षनाथ गोडगे, सेक्रेटरी संस्कृती होम्स सोसायटी यांनी बाणेर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. जखमी दोन्ही सुरक्षारक्षकांना पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी डिलिव्हरी कर्मचारी महेश गायकवाड व अभिषेक महादेव सुतार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस
निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली.

See also  ग्रेट व्हिजन इंग्लिश स्कूल निगडी यांच्या वतीने शालेय ज्ञानारंभ् दिन वृक्षारोपण करून साजरा