छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्याने स्थापित झालेल्या ‘परिवर्तन महाशक्ती’ चा मेळावा छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिर येथे सकाळी १२ वा. आयोजित करण्यात आला आहे.
‘सोडा परंपरागत पक्षांची भक्ती, आता निवडू परिवर्तन महाशक्ती’ असा उल्लेख करत पुर्ण शहरात बॅनर लावण्यात आले आहेत.
या मेळाव्यासाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी, स्वतंत्र भारत पक्षाचे मा. आमदार वामनराव चटप, महाराष्ट्र राष्ट्र समिती प्रमुख मा. आमदार शंकरअण्णा धोंडगे, भारतीय जवान किसान पक्ष, जय विदर्भ पार्टी, महाराष्ट्र विकास पक्ष सहभागी होणार आहेत.
आजच्या छत्रपती संभाजीनगर येथील मेळाव्यात नवीन कोणते पक्ष व नेते सहभागी होतात हे पाहणे औचित्याचे असेल.