डहाणूकर लक्ष्मी नगर येथे स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थेने केले स्वच्छतेसाठी पथनाट्य व जनजागृती

कोथरूड : वॉर्ड कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था मार्फत कचरा वर्गीकरणाबाबत डहाणूकर लक्ष्मी नगर स्लम व सरस्वती विद्यालय येथील शाळकरी मुलाना पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी करण्यात आली.

पथनाट्यामध्ये नागरिकांना ओला सुका कचरा वर्गीकरणासोबत सॅनिटरी कचरा देखील एका कागदामध्ये गुंडाळून त्यावर रेड डॉट करून द्यावा जेणेकरून पुढे जाऊन सॅनिटरी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावता येईल तसेंच स्वच्छ सेवा सहकारी संस्थे च्या कचरा वेचकानमार्फत घेतल्या जाणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून खत  तयार होते तसेंच बायोगॅस साठी देखील त्याचा उपयोग केला जातो आणि सुक्या कचऱ्यामधून त्यांना लागणारे भंगार बाजूला काढून पुढे पुनर्निर्मितीसाठी पाठवले जाते तसेंच त्यांना नागरिकांकडून मिळणाऱ्या User fee बाबत देखील जनजागृती करण्यात आली पथनाट्यच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे जनजागृती झाली नागरिक आणि विद्यार्थ्यांना कचरा वर्गीकरणाचे धडे चांगल्या प्रकारे जनजागृती झाली.


या कार्यक्रम प्रसंगी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे साहेब,आरोग्य निरीक्षक करण कुंभार, आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे साहेब, मुकादम वैजनाथ गायकवाड, आरोग्य निरीक्षक जया मॅडम, साहेब,प्रशिक्षणार्थी आरोग्य निरीक्षक सलीम पठाण,साईराज दुबळे ,स्वच्छ प्रभाग कॉर्डिनेटर सोहन खिलारे ,स्वच्छ वॉर्ड कॉर्डिनेटर पूनम सराटे,  प्रभाग कॉर्डिनेटर माधुरी श्रीखंडे, वैशाली घरटे, मंदा रनसिंग,पथनाट्य टीम मंदार जाधव, नलिनी शेडगे, गणेश घाडगे ,हनुमंत मुंडे, वर्षा शेळके, सरोज भोंगळे उपस्थित होते.*

See also  गरिबीला लाजू नका; शिक्षणात खंड पडू देऊ नका, सावित्री फोरमचेच्या कार्यक्रमात आदर्श शिक्षिका स्वाती वानखडे यांचे आवाहन