कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत बावधन येथे स्वच्छता अभियान निमित्त पथनाट्य व जनजागृती

 कोथरूड : कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत  स्वच्छता ही सेवा अभियान १४ सप्टेंबर २०२४ ते ०१ ऑक्टबर २०२४ राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी ०२ ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत हा दिवस साजरा केला जातो त्याला अजून बळकटी देण्यासाठी  नव्याने समाविष्ट गाव बावधन बुद्रुक अणि बावधन खुर्द आरोग्य कोठी कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका व प्रकृती वेस्ट मॅनेजमेंट अणि जनसुविधा सोशल  फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पथनाट्य सादर करण्यात आले.

या पथनाट्याच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता , ओला व सुका कचरा वेगळा करून घंटा गाडीला देणे तसेच, सॅनेटरी वेस्ट कचरा विलगीकरण करणे असे बावधन बुद्रुक येथे राहणाऱ्या रहिवासी शाळेतील विद्यार्थी यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच नागरिकांमध्ये स्वच्छते बाबत जनजागृती करून महत्त्व पटवून देण्यात आले व स्वच्छता शपथ  कार्यक्रम घेण्यात आला. सदर पथनाट्य करताना आरोग्य निरीक्षक श्री हनुमंत चाकणकर, श्री सचिन लोहकरे, श्रीमती जया सांगडे, मुकादम श्री.राम गायकवाड, श्री विजय पाटील, सुरज पवार,प्रकृती वेस्ट मॅनेजमेंटची टिम, जनसुविधा सोशल फाउंडेशन च्या श्रीमती सुवर्णा वाकणकर मॅडम आणि टीम कै. चेतन दत्ताजी गायकवाड शाळेतील शिक्षक वर्ग अणि विद्यार्थी , पुणे मनपा आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

See also  बाणेर-बालेवाडीमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी जलदगतीने उपाययोजना करा नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश