बाणेर पाषाण लिंक रोड येथे आज सकल मराठा समाज मराठा सहाय्यक समितीची महत्त्वपूर्ण बैठक

पुणे : सकल मराठा समाज औंध पाषाण बाणेर बालेवाडी सुतारवाडी सोमेश्वर वाडी सुस माळुंगे कोथरूड परिसरातील मराठा बांधवांच्या प्रश्नासंदर्भात ओकेजन हॉल बाणेर पाषाण लिंक रोड येथे दिनांक ७/१०/२०२४ रोजी सायंकाळी ५वा. वाजता मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे.

कोथरूड व शिवाजीनगर मतदार संघातील मराठा बांधवांचे प्रश्न, तसेच मनोज जरांगे पाटील यांनी मागितलेल्या मागण्यांना पाठिंबा  दर्शवणे व सरकारने मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करणे, नारायण गड येथील दसरा मेळाव्यासाठी नियोजन करणे, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न, कुणबी दाखले मिळण्यासाठी मिळत असलेले अडथळे यावर चर्चा करणे तसेच कुणबी नोंदी नसलेल्या मराठा बांधवांना ईडब्ल्यूएस सुविधांचे फायदे मिळण्यासाठी चर्चा करणे, स्थानिक मराठा आंदोलन कडे होत असलेले दुर्लक्ष आदी विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येणार आहे.

सकल मराठा समाजाच्या मागण्यांचा लढा हा निर्णय वळणावर असून यावर शासन दरबारी मात्र उदासीनता अथवा मराठ्यांना कायदेशीर प्रक्रियेत अडकवण्याचे निर्णय घेतले जात आहेत. याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीला विविध गावातून महत्त्वाचे मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. तसेच जास्तीत जास्त मराठा बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठा सहाय्यक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या डॉक्टर सेलचा 'संजीवनी आरोग्य मित्र' कार्यक्रम संपन्न