बालेवाडी : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन व क्रीडा व युवा संचनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य शिवजन्मोत्सव सोहळा चे आयोजन सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी, रोजी सकाळी 8 ते 11 वाजता करण्यात आले आहे.
शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त शिवव्याख्यान, शस्त्रास्त्र प्रदर्शन, मर्दानी खेळ, ढोल ताशा पथक, पोवाडा कार्यक्रम आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी अध्यक्ष पुणे शहर सुधारणा समिती, मा. नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केले आहे.
























