पुणे : पुणे महानगरपालिकेत कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडील सेवकांसाठी तणावमुक्त जीवन जगण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
कर आकरणी व कर संकलन कार्यालय हे पुणे महानगरपालिकेतील उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहे. मा. मुख्य
सभा व स्थायी समिती सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता २८७५ कोटी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. दि. १९/१०/२०२४ रोजी १६९० कोटी इतकी वसुली केली आहे. गतवर्षी पेक्षा या वर्षी २४५ कोटी इतकी जास्तीची वसुली केली आहे. तसेच उर्वरित उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी कार्यालयाकडून वसुलीची मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडील कामकाजाची व्याप्ती खूप मोठ्या
प्रमाणात आहे. सदर कामकाजामुळे सेवकांवर अतिरिक्त तणाव राहू नये याकरिता व सेवकांनी तणावमुक्त वसुखी जीवन जगण्यासाठी, व्यक्तिमत्व विकास, मनाची अमर्याद शक्ती उत्तम नातेसंबंध जोपासणे,व्यसनमुक्ती व पैशाचे व्यवस्थापन या बाबत कार्यशाळा जेष्ठ व्याख्याते डॉ. दत्ता कोहिनकर यांनी घेतली.
सदर कार्यशाळा मा. माधव जगताप, उप आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेत सौ. अस्मिता तांबे (धुमाळ), महापालिका सहाय्यक आयुक्त, श्री. सुनील मते, महापालिका सहाय्यक आयुक्त, श्री. रविंद्र धावरे, प्रशासन अधिकारी, सर्व
कार्यालयीन अधीक्षक, विभागीय निरीक्षक, पेठ निरीक्षक व इतर सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.