कुस्ती संघाच्या अध्यक्ष ला अटक करावी या महिला कुस्तीगिरांच्या मागणीला पाठिंबा देत आपची निदर्शने !

पुणे : भारतीय कुस्ती संघाचा अध्यक्ष व भाजपची खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या महिला कुस्तीगीरांनी लैंगिक शोषणाचे आरोप केलेले असून या कुस्तीसंघाचे अध्यक्ष यांना अटक करावी या मागणीसाठी आम आदमी पार्टीने पुण्यामध्ये सणस क्रीडा संकुलाजवळ निदर्शने केली.

‘खरे तर लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप केल्यानंतर आरोपीला तातडीने अटक व्हायला हवी होती परंतु अजूनही ब्रिज भूषण सिंग यांना अटक झालेली नाही, या मागणीसाठी दिल्लीमध्ये जवळपास ५० क्रीडापटू आंदोलन करीत आहेत. ब्रिजभूषण सिंग यांच्यावर ८० पेक्षा जास्त गुन्हे या आधीच दाखल आहेत असे असतानाही मोदी सरकार त्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप यावेळेस करण्यात आला.

‘बेटी बचाव, बेटी पढाव परंतु भाजपचे गुंडों से बचाव’ असा नारा या वेळेस देण्यात आला.
ज्यांच्या कुस्तीतील कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला सन्मान मिळाला आहे त्या खेळाडूंना रस्त्यावर बसून आंदोलन करावे लागणे हे दुर्दैवी आहे. सुप्रीम कोर्टाची पायरी चढल्यावर या आरोपीवर एफआयआर नोंदवली गेली आहे. जर या खेळाडूंना न्याय मिळत नसेल तर सामान्य महिलेला न्याय मिळणे अशक्य आहे. सर्व नागरिकांनी याविरुद्ध आवाज उठवायला हवा आणि या घटनेनंतर यापुढे कुठल्याही क्रीडा प्रशिक्षकांनी खेळाडूंचे शोषण करू नये यासाठी कठोर नियम व नियंत्रण करण्याची गरज यावेळेस व्यक्त करण्यात आली.

या निदर्शनात आप चे सुदर्शन जगदाळे, मिलिंद ओव्हाळ, किरण कांबळे ,रामभाऊ इंगळे, सुरेखा भोसले ,अंजली इंगळे ,ज्योती ताकवले ,सीमा गुट्टे, आरती करंजावणे ,सतीश यादव, सेंथिल अय्यर ,अमोल काळे ,सरफराज मोमीन, समीर आरवडे, निलेश वांजळे, आसिफ मोमीन, साजिद खान, सुहास पवार, शंकर थोरात, आबासाहेब कांबळे, विकास सुपनार, अक्षय शिंदे, शंकर थोरात, घनश्याम मारणे, जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  कोथरूड मतदार संघात काँग्रेसचा घरेलू कामगार मेळावा