बालेवाडीतील नवसाला पावणारे जागृत ग्रामदैवत श्री भैरवनाथ

बालेवाडी : बालेवाडी येथील दगडी मंडपाच्या मंदिरामध्ये विराजमान असलेले ग्रामदैवत श्री भैरवनाथ हे अत्यंत जुने व नवसाला पावणारे जागृत दैवत म्हणून प्रसिद्ध आहे.
पंचकृषीतील अनेक राजकीय, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अनेक मान्यवरांचे श्रद्धास्थान म्हणजे बालेवाडी गावातील एतिहासिक भैरवनाथाचे मंदिर.


प्राचीन काळातील हे मंदिर पूर्वी दगड मातीत बांधले होते पंचवीस वर्षांपूर्वी मंदिराचे बांधकाम गाभाऱ्याला  हात न लावता नवीन स्वरूपात करण्यात आले. गाभारा हा चार कोरीव दगडांच्या खांबाच्या आत तयार केलेला आहे. भाविकांनी वारंवार शेंदूर लावल्याने मूर्तीचे स्वरूप कळत नव्हते परंतु सहा वर्षांपूर्वी मूर्ती वरील शेंदुराचा लेप काढून मुर्त्यांना वज्रलेप लावण्यात आला. त्यामुळे मूर्तीला मूळ  स्वरूप प्राप्त झाले. आनंदाने वाजत गाजत मिरवणूक काढून मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. दरवर्षी चैत्र महिन्यात नऊ दिवस छबिना काढण्यात येतो दहाव्या दिवशी चैत्र पौर्णिमेला भैरवनाथाचा उत्सव साजरा केला जातो. भैरवनाथाची पालखी भजन व ढोल लेझीमच्या मिरवणुकीने गावात प्रदक्षिणा घेतली जाते.

गेली अनेक वर्षांचा इतिहास व समस्त बालेवाडी गावकर्यांसमवेतच पंचकृषीतील अनेक लोकांच्या नवसाला पावणारा भैरवनाथ अशी ख्याती असणारे भैरवनाथ मंदिर. ऐतिहासिक वारसा जतन करत गावांतील सण-उत्सवांमध्ये प्रत्येकजण प्रथम पुजन करुन समस्त गावकरी आपली मनोभावी श्रद्धा बाळगतात.

अनेक राजकीय घडामोडी तसेच सामाजिक सणवार, उत्सव, तसेच बालेवाडी परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरातील शुभकार्य या भैरवनाथाच्या साक्षीने पार पडली आहेत.

See also  महाराष्ट्र सरकारचा ग्रामीण भागातील सरकारी शाळा बंद करून स्वतःचा मंत्र्याच्या खासगी शाळा चालवण्याचा डाव उधळून लावणार! : आप