पुणे : गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आविष्कार स्पर्धा घेण्यात आली. एकुण 185 विद्यार्थ्यांनी 85 प्रकल्प सादर केले. सहा प्रकल्पानुसार प्रकल्पांची संख्या खालील प्रमाणे
1. शुद्ध विज्ञान: 13
2. शेती आणि पशुपालन: 26
3. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान: 10
4. मानवता, भाषा आणि ललित कला :17
5. वाणिज्य आणि व्यवस्थापन: 10
6. औषध आणि फार्मसी: 9
सर्व सहा श्रेणींमधून, एकूण 42 प्रकल्प UG/PG आणि PPG मधून विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवडले गेले.
प्राचार्य डॉ.संजय खरात यांनी महाविद्यालयातील संशोधनपर कार्यक्रमाची माहिती दिली.प्रा. विनायक जोशी (आयक्यूएसी को-ऑर्डिनेटर, एसपीपीयू) यांनी अविष्कार स्पर्धेची पुर्ण माहिती दिली आणी विजयी प्रकल्पला सर्टिफिकेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
स्पर्धेचे परिक्षण डाॅ वर्ष होनमोरे काळे,(गरवारे कॉलेज) सायन्स, डाॅ रूपाली सेठ (हुजुरपागा दुर्गाबाई एम लोहिया माहिला वाणिज्य महाविद्यालय) वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, डाॅ गीता शिंदे,हेड, शिक्षण विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,
डाॅ श्वेता जगताप,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,डाॅ राजश्री पटवर्धन, एच व्ही देसाई काॅलेज, डाॅ कांचन फाटक( वाडिया काॅलेज) या मान्यवरांनी केले. उपप्राचार्य डॉ.ज्योती गगनग्रास, प्रा. स्वाती कंधारकर , डॉ. शुभांगी जोशी मॅडम, डॉ विनायकुमार, डॉ मेहेर, व श्री. प्रकाश रेणुसे, श्री. अमृत कदम यांनी सहकार्या केले.
तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अतिशय उत्साहपूर्ण सहभाग घेतला.
अविष्कार समितीचे सदस्य, डॉ. नीलिमा कुलकर्णी, डॉ. पराग शहा, डॉ. मंजुषा कुलकर्णी, डॉ. कुंभार, डॉ. रागिणी वाडेकर, डॉ. निवेदिता दास, डॉ. अश्विनी पवार, प्रा. मनीषा माटेगावकर, डॉ. मेघा देशपांडे, डॉ. प्राची क्षीसागर, डॉ. प्रतिभा राव, डॉ. रंजना शेवकर, सोनिया जोशी, प्रा देशमाने आणि डॉ वैशाली रणदिवे यांच्या सहभागमुळे आविष्कार स्पर्धा सुरळीत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मदत केली. डाॅ सुषमा कातडे यांनी अविष्कार स्पर्धेचे समन्वय केले.