कोथरूड : वंचित बहुजन आघाडी पुणे शहर* अंतर्गत *कोथरूड कोथरूड विधानसभा मतदार संघ* प्रस्तावित कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडी पुणे शहर कार्यालय येथे शहर अध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, पुणे शहर उपाध्यक्ष विनोद जाधव,पुणे शहर उपाध्यक्ष रफिक भाई शेख, पुणे शहर संघटक सतीश रणवरे,प्रसिद्धीप्रमुख नवनीत आहिरे,परशुराम शेवंगे यांच्या हस्ते व पुणे शहर कार्यकारणी च्या उपस्थिती मध्ये कोथरूड विधानसभा मतदार संघ प्रस्तावित कार्यकारणीचे पत्र विधानसभा अध्यक्ष दिपक कांबळे यांना देण्यात आले, या वेळी विधानसभा उपाध्यक्ष राहुल दहिरे, उपाध्यक्ष अरुण अहिरे, उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकारी यांची नावे पुढील प्रमाणे.
अध्यक्ष- दिपक पांडुरंग कांबळे, उपाध्यक्ष -नारायण जाधव, दत्ता शेंडगे, प्रवीण सोनवणे, गौतम ओव्हाळ, सिद्धेश्वर आप्पा गायकवाड, राहुल दहिरे, अरुण अहिरे, महासचिव – विजय प्रधान, सचिव -सुहास जाधव, सहसचिव-हनुमंत वाल्मिकी, शुभम निकाळजे, संघटक – रामभाऊ शिंपाळे सुनील कसबे, सह संघटक- अतुल निकाळजे, प्रसिध्दी प्रमुख – आदित्य जाधव, सदस्य – राम चव्हाण, भाऊ लोंढे, साहेबराव मंजुळकर, उमेश मस्के, विजय ढगे, बाळासाहेब शेवाळे, हेमंत शेवाळे आदी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.