प्रदेश प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश ॲड डॉक्टर मधुकर मुसळे यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघामध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

शिवाजीनगर :  प्रदेश प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश ॲड डॉक्टर मधुकर मुसळे यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघामध्ये उमेदवारी अपक्ष अर्ज दाखल केला. भाजपाची उमेदवारी विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व काही अलबेल असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न होत असला तरी भाजपाला बंडखोरीचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

शिवाजीनगर मतदार संघामध्ये मधुकर मुसळे यांनी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागितली होती. परंतु विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मधुकर मुसळे यांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मधुकर मुसळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भारतीय जनता पार्टीमध्ये बंडखोरी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मधुकर मुसळे यांची बंडखोरी रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टी काय भूमिका घेणार याकडे शिवाजीनगर मतदार संघातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांचे लक्ष लागले आहे.

See also  बालेवाडी परिसरामध्ये रात्रीच्या अंधारात विनापरवाना रस्ता खोदकाम करून बुडवला जातोय पालिकेचा कोट्यावधीचा महसूल