शिरोळेंचे बोलणे बाळबोध पणाचे – सुनील माने, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार प्रदेश सरचिटणीस

पुणे ता.११ (प्रतिनिधी) : गुंड निलेश घायवळ पुण्यातून परदेशात पलायन केले. यामध्ये महायुती सरकारचे मंत्री सहभागी असल्याचे आता समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना पत्रकारांनी जास्त प्रश्न विचारू नयेत यासाठी आमदार शिरोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप केले आहेत. मात्र हा त्यांनी केलेला बालिश प्रयत्न आहे. अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी केली आहे.


याबाबत बोलताना ते म्हणाले, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी निलेश घायवळ प्रकरणात चौकशी करण्याची मागणी करत अतिशय बाळबोध प्रश्न विचारले आहेत. मुळात घायवळचे आडनाव बदलून गायवळ कधी झाले ? पोलिसांच्या नाकावर टिच्चून एक गुन्हेगार परदेशात फरार कसा झाला? राज्य व केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांना त्याचा सुगावाच कसा लागला नाही हे खरे प्रश्न आहेत. ते सोडून भाजप लोकांच्या डोळ्यात धूळफेक करत बालिश प्रश्न विचारत आहे. पासपोर्ट केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार प्रश्न असल्यामुळे २०२० साली जामखेडचे आमदार कोण होते? तत्कालीन गृहमंत्री, मुख्यमंत्री कोण होते असे प्रश्न विचारणे म्हणजे भाजप स्वत:चा नाकर्तेपणा लपवण्यासाठी केलेला हस्यास्पद प्रयत्न असे म्हणावे लागेल अशी टीका माने यांनी केली आहे.

See also  बाणेर मध्ये पंतप्रधान मोदींच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त महिलांसाठी स्वयंरोजगाराचा आगळावेगळा उपक्रम