मावळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार  सुनील शेळके यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला

मावळ : मावळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. सुनील आण्णा शेळके यांनी महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-२०२४ साठी महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह तसेच मावळच्या  बहिणी आणि बांधवांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी महायुतीतील सर्व स्थानिक नेत्यांनी सुनील आण्णा शेळके यांना  पाठिंबा दर्शवला आहे. याशिवाय, मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळेस ६० हजारांच्या आघाडीने विजयी संकल्प करण्यात आला आहे. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षानेही सुनील आण्णा शेळके यांना जाहीर पाठिंबा देत त्यांना विजयी करण्याचे आश्वासन दिले आहे.

See also  चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील प्रचारात सहभागी, कोथरूडमध्ये नागरिकांच्या घेतल्या गाठीभेटी