पिंपरी चिंचवड पोलीस मोटार परिवहन विभागाच्या वतीने वाहक चालक दिन साजरा

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाच्या अधीन असणाऱ्या मोटर परिवाहान विभाग इथे पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांच्या अध्यक्षतेखाली (वर्ष 3 रे ) वाहक चालक दिन कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.


कार्यक्रमांमध्ये सर्व चालक पोलिस अंमलदार यांना डॉक्टर संजय शिंदे पोलीस सहआयुक्त व काकासाहेब डोळे पोलीस उपआयुक्त, भास्कर ढेरे सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासन) यांनी पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्रक देऊन चालक पोलीस अंमलदार यांचा गौरव करण्यात आला.

तसेच पोलीस चालक अंमलदार यांनी शासकीय गाडी चालवत असताना अपघात टाळण्यासाठी कोण कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत उत्कृष्ट व मोलाची माहिती दिली. तसेच कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम , मोफत नेत्र तपासणी शिबीर यांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी पोलीस कर्मचारी आपल्या कुटुंबासह हजर होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पोलीस निरीक्षक मंगेश पाटील मोटर परिवहन विभाग यांनी केले होते.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला भेट