पुण्यात पुन्हा लोकसभेसाठी रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपा

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरकाँग्रेसकडून महाराष्ट्रामधील पहिली यादी जाहीरकरण्यात आली असून सहा जागांवरती उमेदवार घोषितकरण्यात आले आहेत. पुण्यामधून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर लोकसभेला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची
उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

काँग्रेसकडून नंदुरबार अमरावती नांदेड पुणे लातूर सोलापूर
आणि कोल्हापूर या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात
आले आहेत. नंदुरबारमधून गोवळ पडवी यांना उमेदवारी
देण्यात आली आहे. अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना
उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेडमधून वसंतराव
बळवंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर
लातूरमधून शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देण्यात
आली आहे. तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी
देण्यात आली आहे.

रवींद्र धंगेकर यांच्या माध्यमातून काँग्रेसने भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांच्या समोर तगडे आव्हान उभे केल्यामुळे पुण्याची लढत ही चुरशीची होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवत काँग्रेस पक्षाला विधानसभेतील एकमेव पुणे शहरातील प्रतिनिधित्व मिळवून दिले होते. यानंतर लोकसभेतही धंगेकर पुणे शहरातून चालतील अशी चर्चा सातत्याने होत होती त्याप्रमाणे अपेक्षित निर्णय काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आला असल्याचे पाहायला मिळत आहे.

See also  राम नदीतील प्रदूषणा बाबत हरित लवादाकडे आम आदमी पक्षाच्या कुणाल घारे यांनी याचिका दाखल केली