औंध : औंध भागातील सर्व जेष्ठ नागरिक संघ सभासद यांना नवं-वर्ष २०२४ निमित्त शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन दत्तात्रय गायकवाड मा.महापौर यांचे कडून करण्यात आले.
मारुतराव गायकवाड उद्यान येथे मोठया संख्येने ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिक सभासद उपस्थित होते. सलग २५ वर्षे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. प्रभाकर उलंगवार यांनी केले.दत्तात्रय गायकवाड यांनी शुभेच्छा मार्गदर्शन केले. सर्वांचा गुलाबपुष्प व कालनिर्णय देऊन सन्मान करण्यात आला.