चायवाल्या नेत्याचा कार्यकर्ता किटली घेऊन भोर वेल्हे मुळशीच्या मैदानात

मुळशी : भोर वेल्हे मुळशी विधानसभा मतदारसंघ निवडणूकीत शिवसेना भाजपा महायुतीचे बंडखोर उमेदवार किरण दगडे यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. यामुळे भोर वेल्हे मुळशीची लढत चौरंगी समजली जात आहे.

भोर वेल्हे मुळशीच्या विधानसभा रिंगणात पारंपरिक चार प्रमुख पक्षांचे नेते समोरासमोर भिडणार आहेत. महाविकास आघाडी कडून काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम थोपटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शंकर मांडेकर, महायुतीचे भाजपाचे बंडखोर उमेदवार किरण दगडे, शिवसेनेचे बंडखोर कुलदीप कोंडे निवडणूक रिंगणात उभे असून पारंपरिक लढती बरोबरच भाजपाचा कार्यकर्त्यांना देखील या निमित्ताने ताकद आजमावण्याची संधी दगडे यांच्या माध्यमातून मिळाली आहे.

किरण दगडे यांच्यासाठी बावधन ग्रामस्थांनी देखील एकत्र येत गावात अन्य कोणत्याही पक्षाचा बुथ लावायचा नाही अशी भूमिका बैठक घेऊन जाहीर केली. यामुळे गावापासूनच खंबीर पाठिंबा मिळवत चाललेले किरण दगडे हे या लढती मधील लक्षवेधी ठरत आहेत. प्रामुख्याने तीन वर्षात भोर वेल्हा मुळशी तालुक्यात केलेली कामे, निर्माण केलेले भाजपाचे केडर व सर्व सामावेशक चेहरा, गाव खेड्यावर पोहोचलेला दांडगा जनसंपर्क म्हणून किरण दगडे यांच्याकडे मतदारांचे विशेष आकर्षण पाहायला मिळत आहे.

मुळशी तालुक्यातील मतांचे विभाजन थांबवण्याचे मोठे आवाहन शिवसेना भाजपाचे बंडखोर उमेदवार किरण दगडे यांच्यापुढे असणार आहे. तीनही तालुके व शहरी भाग यांच्याशी जनसंपर्क असल्याने विजय निश्चित आहे असे किरण दगडे सांगत आहेत. किरण दगडे यांच्या उमेदवारीमुळे भोर वेल्हा मुळशी तालुक्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलली आहेत. यामुळे निवडणुकी मधील प्रचारादरम्यान कोणत्या मुद्द्यांवर अधिक भर दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

See also  मांजरी-साडेसतरा नळी परिसरात प्रशांत जगताप यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद