भेकराईनगर फुरसुंगी येथील मुख्य रस्त्यावरील खड्डे मुजवावे – उल्हास तुपे

हडपसर: भेकराईनगर फुरसुंगी सासवड मुख्य रस्त्याच्या कडेला व रस्त्याच्या मध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत रोज टू व्हीलर फोर व्हीलर वाल्यांचे अपघात होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार मागणी करून देखील या रस्त्यावरील सुरक्षितते संदर्भात उपायोजना आलेल्या नाहीत तसेच रस्त्यावरील खड्डे म्हणून आले नाहीत.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या गट मुळे गाड्या घसरून अपघात होतात.आज पर्यंत सुमारे चाळीस-पंचेचाळीस जणांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लहान मुले वयोवृद्ध तरुण मृत्युमुखी पडले आहेत. तसेच कितीतरी जण अपंग झाले आहेत.

शासनाने त्वरित खड्डे मुजवावे अन्यथा तीव्र जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे यांनी दिला आहे.

See also  पाषाण सुतारवाडी येथे शिवसेनेच्या वतीने होऊ द्या चर्चा"करूया बोल घेवड्या योजनांचा भांडाफोड" कार्यक्रमाचे आयोजन