बाणेर बालेवाडी येथे चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य दुचाकी रॅली

बालेवाडी : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार  चंद्रकांतदादा पाटील यांच्या विधानसभा प्रचारासाठी बाणेर बालेवाडी परिसरामध्ये भव्य बाईक रॅलीचे आयोजन  करण्यात आले होते.

बालेवाडी येथील अष्टविनायक मित्र मंडळ पासून दुचाकी रॅली सुरुवात करण्यात आली. यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी अमोल बालवडकर यांच्यासोबत बैलगाडी मध्ये उभे रहात प्रचार केला.

यावेळी अमोल बालवडकर, प्रकाश बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, लहू बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, सचिन पाषाणकर, सागर बालवडकर, सुभाष भोळे, शिवम बालवडकर, सचिन दळवी, रोहन कोकाटे, सचिन सुतार, अस्मिता करंदीकर आदी उपस्थित होते.

प्रल्हाद सायकर यांच्या कार्यालयाजवळ क्रेनद्वारे भव्य हार घालण्यात आला. बाणेर येथील गणेश मंदिर येथे प्रचाराची सांगता करण्यात आली. या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने युवक वर्ग व महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. समाजातील विविध घटकांकडून तसेच सोसायटी परिसरातील नागरिकांकडून व महिलांकडून चंद्रकांत दादा पाटील यांना औक्षण करून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

See also  न्यायमुर्ती श्री.अभय  सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली वाहन उत्पादक आणि वाहन वितरकांची बैठक संपन्न