औंधगाव तालीम संघाला आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या माध्यमातून कुस्तीचे मॅट सुपूर्द

औंध : औंधगाव तालीम संघाच्या वतीने आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या माध्यमातून मिळालेल्या कुस्ती मॅटचा उद्घाटन व सुपूर्द सोहळा औंधगाव महिला कुस्ती केंद्र येथे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते व हिंदकेसरी अभिजीत कटके यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेविका अर्चना मुसळे, ॲड मधुकर मुसळे, माजी नगरसेवक आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे, वस्ताद विकास रानवडे, केदार कदम,युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते, अविनाश कांबळे, दिलीप रानवडे, मुन्ना झुंजुर्के, सचिन मानवतकर, सौरभ कुंडलिक, योगेश जुनवणे, नाना वाळके, जायभाय सर, मनीष रानवडे, सचिन वाडेकर आदी उपस्थित होते.

आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, औंध गाव तालीम संघाच्या माध्यमातून अनेक खेळाडू विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करीत आहेत. त्यांच्या सरावासाठी मॅट उपलब्ध करून देत असताना विशेष आनंद होत असून पैलवान नेहमी संघर्ष करत मोठे होतात. ही संघर्षाची परंपरा औंध गाव तालीम संघाच्या माध्यमातून कायम राहिली असून त्याची वाटचाल यशाकडे होत आहे.

यावेळी औंध गाव तालीम संघाच्या वतीने श्रावणी पूजेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मधुकर मुसळे यांनी आपले विचार व्यक्त करताना कुस्ती क्षेत्रातील संकुल उभारताना आलेल्या अनुभवांचे कथन केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक वस्ताद विकास रानवडे यांनी केले तर आभार बाळासाहेब रानवडे यांनी व्यक्त केले.

See also  औंध विद्यांचल हायस्कूल आयोजित अंतर शालेय बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन