खडकवासला : खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांचा प्रचारास धायरीगाव आणि परिसरामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने प्रचार फेरीत सहभागी झाली होते.
प्रचार दौरा सुरू करण्याआधी सचिन दोडके यांनी धायरी येथील परमपूज्य शिवभक्त जैतुजी महाराज समाधीचे दर्शन घेतले. धायरीच्या विकासासाठी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली.
खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष त्र्यंबक मोकाशी, काका चव्हाण, आनंद मते, महेश पोकळे, हनुमंत शिवूर, नितीन वाघ, राहुल घुले, संतोष चाकणकर, नरेंद्र हगवणे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.