यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून फिरते म्युझियम उपक्रमाची सुरुवात

मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई यांच्या माध्यमातून नाशिक येथे ‘फिरते म्युझियम – Museum on Wheels’ या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.

या उपक्रमात एका बसमध्ये विविध वाद्ये ठेवण्यात आली आहेत. त्याची सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचबरोबर ती वाद्ये वाजवण्याची संधी देखील लहान मुलांना देण्यात आली, त्यामुळे मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शाळेतील लहान मुलांबरोबरच शिक्षकांनी देखील या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला.

या उपक्रमांतर्गत पुढील काही दिवस ही म्युझियम बस नाशिक परिसरातील विविध शाळांमध्ये जाऊन माहिती देणार आहे. नाशिक जिल्ह्यातील शाळांना आणि शिक्षकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

या उपक्रमाचे आयोजन अत्रेय चक्रवर्ती, शंतीनी सुतार, ऋतुजा काळे, अमित पाले, प्रदीप तळेकर शिवाजी तावरे तसेच यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नाशिक येथील भूषण काळे, गणेश ढगे करत आहे.

See also  राज्यपाल,मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.