कंत्राटदारांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनानंतर पुण्यात बैठक ;
शरद पवार यांचे सुनील माने यांना आश्वासन

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटदारांनी शरद पवार यांना त्यांच्या राज्य सरकारकडील थकीत ६५ हजार कोटींच्या बिलांसाठी साकडे घातले आहे. कंत्राटदार संघटनांनी पक्ष प्रवक्ते सुनील माने यांना त्याबाबत दिलेल्या निवेदनानुसार, माने यांनी नवी दिल्लीत खासदार शरद पवार यांची भेट घेऊन या प्रश्नाची माहिती दिली.

शरद पवार यांनी याबाबत चर्चा करण्यासाठी संसदेच्या अधिवेशनानंतर पुण्यात बैठकीसाठी वेळ देण्याचे मान्य केले असल्याची माहिती प्रवक्ते सुनील माने यांनी दिल्लीत दिली.
पत्रात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील हजारो छोटे-मोठे कंत्राटदार आहेत, त्यांच्यावर जवळपास ५० लाख असंघटित कामगार अवलंबून आहेत. या कंत्राटदारांनी राज्य सरकारच्या विविध विभागांची जी विकास कामे केली आहेत त्या बिलांचा निधी सरकारकडून अद्याप मिळालेला नाही. ही रक्कम जवळपास ६५  हजार कोटी रुपये झाल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. तसे निवेदन त्यांनी राज्यशासनाच्या विविध खात्यांसह माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवले आहे. शासनाकडून पैसे मिळाले नसल्याने नैराश्यातून, सांगली मधील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील याने या काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली.  राज्यात हा प्रश्न महाराष्ट्रात खूप जटिल बनला आहे.

अनेक छोटे मोठे कंत्राटदार ज्यांनी कर्ज काढून शासनाचे प्रकल्प पूर्ण केली.  शासनाकडून त्यांच्या कामाचे  पैसे मिळत नसल्याने ते आता कर्जात बुडाले आहेत. त्यामुळे तेही अशा पद्धतीने टोकाचे पाऊल उचलणार असल्याची भावना कंत्राटदार बोलत आहेत. या प्रश्नावर आपण तातडीने मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, कंत्राटदारांची होणारी आर्थिक कुचंबना आणि त्यांचे अडलेले पैसे सरकारने द्यावेत यासाठी तोडगा काढावा. अशी विनंती सुनील माने यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे केली. शरद पवारांनी संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर या कंत्रातदारांना एकत्रित पुण्यात बोलवून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आश्वासन पवार यांनी सुनील माने यांना दिले.

See also  पीओके प्रमाणे, काँग्रेस नव्हे तर ‘भ्रष्टाचारी व्याप्त भाजप’…!फडणवीसांकडून बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन -कॉँग्रेसचे चोख प्रत्युत्तर