कर्वेनगर :कर्वेनगर गावठाण व अन्य परिसरात मुलांना खेळण्यासाठी मैदानच नाही त्यामुळे या भागातील मुलांनी खेळायचे कोठे असा सवाल श्री कुमार बराटे यांनी केला. महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार श्री चंद्रकांत मोकाटे यांनी कर्वेनगर भागात पदयात्रेद्वारे नागरिकांबरोबर संपर्क साधला. त्यावेळी या भागातील कार्यकर्ते कुमार बराटे यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
श्री बराटे म्हणाले की, पूर्वी पुणे महापालिकेच्या सम्राट अशोक विद्यालयाच्या मैदानात या परिसरातील मुले खेळत होती. पण काही वर्षांपूर्वी पुणे मनपाने या मैदानात 3 मजली इमारत बांधली व मैदानाचा आकार छोटा केला. त्यामुळे या परिसरातील मुलांची कुचंबणा होतं आहे. या परिसरातील मुलांना कबड्डी, क्रिकेट, खो खो आदी खेळांची आवड आहे या परिसरातील मुले मुली वेगवेगळ्या संघातून खेळून कर्वेनगर परिसराचे नावं उंचावत आहे.
त्यांना खेळापासून किती दिवस वंचित ठेवायचे असा प्रश्न श्री कुमार बराटे यांनी केला.
चंद्रकांत मोकाटे यांनी त्यांच्याशी व अन्य नागरिकांशी बोलताना मैदानाविषयी लवकरच मार्ग निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली.