पुणे : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह बदनामीकारक मजकूर प्रसारित करून विद्वेष पसरविणाऱ्या आरोपीवर गुन्हे दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी पुणे शहर शिवसेना,युवासेना,महिला आघाडी व शेकडो शिवसैनिकांच्या वतीने पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
अभय नामक ट्विटर अकाउंट वरून गेल्या अनेक दिवसांपासून बदनामीकारक मजकूर,मॉर्फ केलेले फोटो तसेच आक्षेपार्ह लिखाण केले जात असून मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या या नराधमावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी या मागणीसाठी पुणे पोलीस आयुक्तालयात शेकडो शिवसैनिक,पदाधिकारी एकवटले होते, पोलीस आयुक्तांनी आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून सदर आरोपीवर आयपीसी ऍक्ट 469,499,500 नुसार सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे,सहसंपर्कप्रमुख अजय बापू भोसले, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे,शहर संघटक श्रीकांत पुजारी,महिला आघाडी शहरप्रमुख लिनाताई पानसरे, उपशहरप्रमुख विकास भांबुरे, सुधीर कुरुमकर, संजय डोंगरे, विकी माने, संतोष राजपूत, माथाडी जिल्हाप्रमुख निलेश माझीरे, युवासेना उपशहर प्रमुख गौरव साईनकर, उपशहर प्रमुख महिला आघाडी चैत्राली गुरव, उपशहरप्रमुख संघटिका श्रद्धा शिंदे, शहर संघटक प्रमोद प्रभुणे, गणेश काची, विभाग प्रमुख अक्षय तारू, मयूर पानसरे, नितीन लगस, निखिल पवार, शंकर संगम, नेहा शिंदे, उपविभाग प्रमुख संदीप धुमाळ, डेविड खोडे, सचिन चव्हाण, नवनाथ निवंगुणे, प्रभाग प्रमुख कैवल्य पासलकर, अमर घुले व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.