सुतारवाडी : लेक व्यू पार्क सोसायटी सुतारवाडी पाषाण या ठिकाणी सोसायटी मधील अंतर्गत रस्त्याचे खूपच दुरावस्था झाली होती. तरी सोसायटीतील नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून पृथ्वीराज दादा सुतार यांच्याकडे तीन आठवड्यापूर्वी रस्त्याच्या कामासंदर्भात मागणी केली होती. पृथ्वीराज दादा यांनी नागरिकांची समस्या लक्षात घेऊन सदर सोसायटीतील अंतर्गत रस्त्यांचा काँक्रिटीकरण व ब्लॉक बसवण्याचे काम पूर्ण करून दिले केलेल्या मागणीची पूर्तता केली.
असेच विविध कामे करून देण्याचे पृथ्वीराज दादांनी नागरिकांना वचन दिले. व दिलेला शब्द पूर्ण केला याबद्दल सोसायटीतील नागरिकांनीही पृथ्वीराज दादांचे आभार मानले. याप्रसंगी सोसायटीतील सर्व नागरिक उपस्थित होते. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते माजी नगरसेवक पृथ्वीराज दादा सुतार, आशुतोष आमले (उपशहर संघटक),संतोष तोंडे (विभाग प्रमुख),संजय निम्हण (विभाग संघटक),स्वातीताई रणपिसे (विभाग संघटिका), महेश सुतार (शिवदूत), ऋषिकेश कुलकर्णी (प्रभाग प्रमुख), दिनेश नाथ (उपविभाग प्रमुख), संदीप सातव (उपविभाग प्रमुख) ,अमित रणपिसे (युवा सेना अधिकारी),अशोक दळवी , शंकर सुतार,करण कांबळे (प्रचार प्रसिद्धी प्रमुख), अजिंक्य सुतार (शाखाप्रमुख),अमोल फाले (शाखाप्रमुख) ,सुनिता रानवडे (शाखा संघटिका), रुपाली ताई सुतार, स्वराज्य प्रतिष्ठानचे सर्व सभासद आजी-माजी पदाधिकारी सर्व उपस्थित होते.
यावेळी पृथ्वीराज सुतार म्हणाले, नागरिकांचे काम सातत्याने करत आलो आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काही कामे सांगितली होती ती कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. रस्त्याचे काम पूर्ण केले आहे यापुढे देखील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रयत्न करत राहील.