वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी तज्ज्ञांचा कृती गट स्थापणार – दत्ता बहिरट

शिवाजीनगर : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा गेल्या दहा वर्षांचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यावर माझा भर राहणार असून, त्यासाठी आगामी पाच वर्षांत राज्य शासनाकडून भरीव विकासनिधी मी मिळवेन. तसेच मतदारसंघातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी केंद्र व राज्य सरकार, पुणे महानगरपालिका, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर, वाहतूक पोलीस, विविध तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्था यांचा कृती गट स्थापन करून वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर उपाय शोधणार आहे.

याशिवाय ५०० चौरस फुटांखालील सदनिकांचा मिळकतकर रद्द करून घेणे, झोपडपट्टीवासीयांचे त्याच जागी ५५० चौरस फुटांचे मोफत घर देऊन पुनर्वसन करणे आणि युवकांच्या कल्याणासाठी कौशल्यविकासावर भर देणे ही कामे मी प्राधान्याने करणार आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट, आम आदमी पार्टी व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी आज केले. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात त्यांच्या प्रचारार्थ निघालेल्या भव्य जीप यात्रेत ठिकठिकाणी मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.


दीप बंगला चौक येथून सुरू झालेल्या जीप यात्रेत शेकडो दुचाकीस्वार सहभागी झाले होते. त्यात महिलांची संख्याही लक्षणीय होती. तिन्ही पक्षांचे झेंडे फड़कत होते. फटाक्यांची जोरदार आतषबाजी होत होती. मार्गावर अनेक गणेशोत्सव मंडळे व संस्थांतर्फे दत्ता बहिरट यांना श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जात होता. जीप यात्रेतील सहभागींना ठिकठिकाणी पाणी दिले जात होते. अनेक ठिकाणी महिलांनी दत्ता बहिरट यांचे औक्षण केले. वाहतुकीला अडथळा येणार ऩाही, अशा रीतीने या जीप यात्रेचा खिलारेवाडी येथे समारोप झाला.


या जीप यात्रेत दत्ता बहिरट, दीप्ती चवधरी (माजी आमदार), उदय महाले, नीलेश निकम, श्रीकांत पाटील, माउली यादव, उमेश वाघ,  प्रवीण डोंगरे, राजाभाऊ साठे, करुणाताई घाडगे, राजश्रीताई अडसूळ, आनंद मंजाळकर, प्रशांत राणे, अजित जाधव, विशाल जाधव, प्रवीण डोंगरे, मुकुंद किर्डक, जावेद निलगर, कैलास मंजाळकर, अस्लम मिरजकर, विनोद रणपिसे, राजेंद्र भुतडा, अन्वर शेख, सचिन बहिरट, प्रीतम चव्हाण, सतीश चव्हाण, सुभाष काळे, राज निकम, अनिकेत देशमाने, पौर्णिमा बहिरट, गणेश साळुंखे, गणेश घुगळे, गोविंद पवार आदी सहभागी झाले होते.
दीप बंगला येथून सुरू झालेली जीप यात्रा महालेनगर, मंजाळकर चौक, डॉ. होमी भाभा हॉस्पिटल, रामोशीवाडी, जनता वसाहत, शिवाजी हाऊसिंग सोसायटी, स्व. प्रमोद महाले पुतळा, ज्ञानेश्वर पादुका चौक, पुणे महानगरपालिका, पुलाचीवाडी, गरवारे मेट्रो स्टेशनमार्गे खिलारेवाडी येथे समाप्त झाली.

See also  'घरोघरी तिरंगा' उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख