बालेवाडी : बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन आणि नवचैतन्य ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ममता चौक ते एफ रेसिडेन्सी या नवीन हायस्ट्रीट वरील रस्त्यावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी BWF चे कार्यकर्ते आणि नवचैतन्य ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद, परिसरातील दुकानदार उपस्थित होते..
या कार्यक्रमात माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सहभाग नोंदवीला. श्री.अमोल बालवडकर यांनी त्यांच्या भाषणात बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनच्या कार्याची प्रशंसा केली. श्री.अमोल बालवडकर म्हणाले की, पुणे मनपा, स्मार्टसिटीच्या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेऊन बालेवाडीतील नागरी समस्या सोडवण्यात बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन यशस्वी होत आहे.
या वृक्षारोपण कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की आज लावलेल्या ७१ झाडांना भविष्यात जगविण्याची जबाबदारी येथील दुकानदारांनी स्विकारली आहे. यातून प्रेरणा घेऊन शामसुंदर इलेक्ट्रिक अँड प्लंबींग शाॕप चे मालक श्री.राधे यांनी वृक्षारोपणासाठी लागणाऱ्या कूदळी, फावडे, टोपलींचे २ – २ सेट फेडरेशनला भेट म्हणून दिली.
श्रीमती मेघना भंडारी यांनी फेडरेशनच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मागील दोन दिवसा पासून श्री.अमेय जगताप, मेघना भंडारी आणि समाधान गायकवाड यांनी खूप परिश्रम घेतले.

