विघ्नहर्ता नागरी सह पतसंस्था आणि मॉर्निंग ग्रूप पाषाण यांच्या संयुक्त विद्यमाने  इयत्ता १० आणि १२ च्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन

पाषाण : विघ्नहर्ता नागरी सह पतसंस्था आणि मॉर्निंग ग्रूप पाषाण यांच्या संयुक्त विद्यमाने  इयत्ता १० आणि १२ च्या विद्यार्थ्यांची करिअर विषयी आणि परीक्षे विषयी भिती,गैरसमज दूर करण्यासाठी व्याख्यान मालेचे आयोजन लोकसेवा इ- स्कूल सूस रोड पाषाण येथे करण्यात आले होते.याप्रसंगी पाषाण,सुतारवाडी, सूस,सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी, बावधन या भागातील 250 हून अधिक विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले होते.

या व्याख्यान मालेचे उद्घाटन प्रसिद्ध वक्ते मा. प्राचार्य श्री. गणेशजी शिंदे सर, मा. प्राचार्य संजय कुलकर्णी सर, मा.श्री. नरहरी पाटील सर, राष्ट्रपती पदक विजेते मा.श्री.मधुकर रणपिसे सर, विघ्नहर्ता संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती भारतीताई विधाते, उपाध्यक्ष मा. प्रकाश गायकवाड, सेक्रेटरी सौ मनिषाताई कदम, संचालक मा. रामदास कुदळे, रोहिदास कोकाटे, व्यवस्थापक  सुधाकर मोरे, उद्योजक मा.श्री सोमनाथ कदम,सर्व कर्मचारी,अभीकर्ता प्रतिनिधी तसेच मॉर्निंग ग्रूप चे जयप्रकाश गिरमकर, ॲड.संजय दहीभाते , मा श्री.पागिरे सर तसेच विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

व्याख्यानमालेमध्ये प्रथम प्राचार्य गणेश शिंदे सर यांनी प्रेरणात्मक विचार सर्व सामान्य माणसांना पटेल आशा भाषेत मांडले. तसेच  संजय कुलकर्णी सर यांनी करिअर विषयी मार्गदर्शन करून पालकांच्या शंकांचे निरसन ही केले.

व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन मा. श्री. गणेश कदम यांनी केले.
उपस्थितांचे आभार शैलेश निम्हण यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता श्रीमती भारतीताई विधाते यांनी पसायदान म्हणून केली.

See also  उमरजी मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटलमध्ये गर्भ उपचार कार्यशाळा 2024 यशस्वीपणे संपन्न