पुणे महानगरपालिकेचे 2024 -25 चे बजेट तयार करताना नागरिकांच्या सूचना आणि गरजा जाणून घेण्यासाठी क्षत्रिय कार्यालय पातळीवर सभा घ्या; ‘आप’ ची मागणी

पुणे : दहा हजार कोटींचा अर्थसंकल्प असणाऱ्या पुणे महानगरपालिकेचे 2024 25 या आर्थिक वर्षाचे बजेट तयार करताना त्यात नागरिकांचा सहभाग असावा अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना करण्यात आली. मुंबई महानगरपालिका अधिनियम 2009 च्या कलम २९B ते २९E च्या संदर्भाने महापालिकेचे आर्थिक बजेट तयार करताना नागरिकांच्या सूचना तसेच गरजा लक्षात घेतल्या जाव्या असे यावेळी आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे म्हणाले.

महापालिकेच्या माध्यमातून क्षेत्रीय कार्यालय पातळीवर नागरिकांसाठीचे सहभागी बजेट हे अत्यंत तुटपुंज्या रकमेचे असते. पाच लाख रुपयांच्या रक्कमेमध्ये नागरिकांनी सुचवलेली कोणतीही मोठी कामे होत नाहीत अशा परिस्थितीत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीत. त्यामुळेच महापालिकेने यंदाचे बजेट तयार करताना पारदर्शकता ठेवत “बहुजन हिताय” या आपल्या ब्रीदवाक्यप्रमाने नागरिकांचा सहभाग घेण्याचे मोठेपण दाखवावे. *बजेटमध्ये अनेकदा जी कामे सुचवली जातात कालांतराने त्याचा निधी वर्ग करून इतर ठिकाणी वापरला जातो, व त्यामुळे नागरिकांच्या गरजेची कामे होताना अडथळे निर्माण होतात तसेच अनेकदा नागरिकांना कामासाठी बजेट उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी तसेच नागरिकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या महापालिकेने बजेट तयार करताना नागरिकांचा सहभाग करून घ्यावा अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे केली गेली.

सदर निवेदन देतेवेळी आम आदमी पक्षातर्फे सुदर्शन जगदाळे, सतीश यादव, अक्षय शिंदे, आप्पा कोंढाळकर, सुरेखा भोसले, प्रशांत कांबळे, शंकर थोरात, अमोल मोरे, धनंजय बेनकर, अभिजीत परदेशी, प्रीतम कोंढाळकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  मुळशी साठी पुर्ण वेळ गटविकास अधिकारी मिळावा म्हणून स्वराज्य पक्षाचे बोंबा मारो आंदोलन