औंध बाणेर बालेवाडी पाषाण परिसरातून मराठा बांधव अंतरवली सराटीकडे महाबैठकीसाठी रवाना

बाणेर : बाणेर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकल मराठा समाज बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडी औंध सोमेश्वरवाडी बोपोडी सुस महाळुंगे परिसरातील मराठा बांधव अंतरवली सराटी येथे होत असलेल्या मराठा महाबैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी अंतरवाली सराठी येथे मराठा महा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी बाणेर बालेवाडी औंध पाषाण सुतारवाडी सोमेश्वर वाडी सुस महाळुंगे छत्रपती शिवाजीनगर परिसरातील 200 हून अधिक मराठा बांधव रवाना झाले.

बाणेर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची ही बैठक महत्त्वाची समजली जाते आहे. परिसरातून जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्यात येणार असून आठ गावातून १७ हून अधिक मराठा उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याची तयारी पूर्ण केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

See also  औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत उघड्यावरच जाळाला जातोय ठिकठिकाणी कचरा