पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आदरणीय नेत्या मा. सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांसाठी वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग व भवानी पेठ ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे मा. सोनियाजी गांधी यांच्या वाढविसानिमित्त ग्रंथालय व वाचनालय काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी सुरू करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष श्री. अरविंद शिंदे यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले की, ‘‘काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या ज्ञानात भर घालून भाजपाच्या खोट्या नेरॅटिव्हला जर बळी पडायचे नसेल तर पुस्तकी ज्ञान असणे गरजेचे आहे. कारण पुस्तके ‘‘जो भविष्यात वाचेल तोच पुढे भविष्यात वाचेल’’ असे सांगितले.
अनुसूचित जाती विभाग व भवानी पेठ ब्लॉक अध्यक्ष श्री. सुजित यादव यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले. संदिप कांबळे यांनी आभार मानले. यावेळी उपस्थितांचा सत्कार संविधानाची उद्देशिका देऊन करण्यात आला.यावेळी बाळासाहेब अमराळे, मेहबुब नदाफ, राज अंबिके, प्रदिप परदेशी, चेतन पडवळ, संतोष सुपेकर, गणेश गुगळे, पप्पू सर्यवंशी, मुन्ना खंडेलवाल, रोहित घोडके आदी उपस्थित होते.
पुणे कॅन्टोन्मेंट ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने तयबिया यतीमखाना येथे लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक रफिक शेख, अजित दरेकर, ब्लॉक अध्यक्ष आसिफ शेख, येसू डोरास्वामी, स्टेनली रफुभाई, अहमद भाई आदी उपस्थित होते.
तसेच बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने मा. सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त चेतन दत्ताजी इंग्लिश मीडियम स्कूल येथे मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा, ब्लॉक अध्यक्ष विशाल जाधव, शिवसेना नेते पिंपरी चिंचवड गोपाळजी मोरे व अजित थेरे कोषाध्यक्ष बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटी, गणेश लालबिगी, श्रीकांत जगताप, अन्वर शेख, बाबा तांबोळी, व शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत होते. शिवाजीनगर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. अजित जाधव यांनी वडगाव येथील नवरत्न ओल्ड एज होम वृद्धाश्रमाला चार व्हीलचेअर देऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक छोटासा उपक्रम केला, यावेळी त्या वृद्धाश्रमाच्या संचालिका सौ. अनिता रोकडे ताई या उपस्थित होत्या.