औंध कुस्ती केंद्रातील राज्यस्तरीय खेळाडू व अयोध्या पर्यंत सायकल प्रवास केलेले भालचंद्र रानवडे यांचा सत्कार

औंध : औंधगाव कुस्ती केंद्रातील राज्यस्तरीय स्पर्धांमधील विजेते खेळाडू व भालचंद्र रानवडे यांनी नुकतेच सायकल वरून पुणे ते आयोध्या असा प्रवास पुर्ण करुन अभिमानस्पद कामगिरी केल्याबद्दल औंध कुस्ती केंद्र भाजपाचे चिटणीस प्रकाश बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राहुल बालवडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी वस्ताद विकास रानवडे, प्रा.सुनिल अडसुळे, पुणे बुलेटिन संपादक केदार कदम, प्रविण कांबळे, कांबळे पाटील,विरेंद्र रानवडे, खामगाव चे सरपंच देशमुख यांच्या हस्ते राज्य अजिंक्यपद स्पर्धेत पदक विजेते व स्कूल ऑलिम्पिक गेम्स मध्ये कुस्ती व ज्युदो मध्ये पदक प्राप्त खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

तसेच भाजपा चिटणीस पदी प्रकाश तात्या बालवडकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. पुणे जिल्हा कबड्डी कुमार गटातील अजिंक्यपद मिळवल्याबद्दल प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्टसचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला.

See also  गोष्टींच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी उभारण्याचा संकल्प - पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन