विद्यापीठ विध्यार्थ्यांच्या दारी, प्र कुलगुरू डॉ. पराग कालकर यांची मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंडला भेट

पुणे : कॉम्प्युटर क्लाऊल्डिंग, आर्टिफिशीयल इंटेलिजन्ट, अडवान्सड टेकनॉलॉजि, इंडेपथ रि सर्च अशा कन्सेप्ट आता नवीन नाही त्यांना घाबरून जायचे नाही. नवीन एज्युकेशन पॉलिसी ही आपल्यासाठी चांगले भविष्य घेऊन आली आहे असे नवीन प्र. कुलगुरू डॉ. पराग कालकर विध्यार्थ्यांशी बोलताना म्हणाले.


पुढे बोलताना डॉ. कालकर त्यांनी तिन्ही शाखाच्या करिअरच्या संधी सांगितल्या. उत्तम चारित्र्य कसे असावे या बद्दल मार्गदर्शन केले.नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विध्यार्थीआपल्या आवडीचे विषय घेऊ शकतात. कुठल्याही शाखेचे विध्यार्थी कला किंवा वाणिज्य व इतर कुठलेही कौशल्य विषय निवडू शकतील.


यामुळे त्यांची उद्योजकीय व रोजगार कौशले वाढतील. आर्टिफिशियल इंटिलीयीन्सचा सर्व क्षेत्रात समावेश झाला आहे.यावर मात करत याचा चांगला उपयोग कसा करता येईल व यामुळे कुठल्या चांगल्या संधी भविष्यात आपल्याला उपलब्ध होतील याचा विचार आत्ताच करणे कसे आवश्यक आहे याची सविस्तर चर्चा विध्यार्थ्याशी करत त्यांनी विध्यार्थ्याची मते विचारली व त्यावर संशोधन करणे गरजेचे आहे हे स्पष्ट केलें.

प्र.कुलगुरू डॉ. पराग कालकर मॉडर्न कॉलेजच्या विध्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले. या अचानक भेटीमुळे महाविद्यालयात उत्साहचे वातावरण तयार झाले.
प्र.कुलगुरूनी शिक्षकांशी बोलताना कॉलेजचे विध्यार्थी व संशोधन याविषयी चर्चा केली. संशोधनाला प्रोत्साहन कसे देता येईल व जास्तीत जास्त विध्यार्थी संशोधनाकडे कसे वळतील या वर भर द्यावा असे आवाहन केले.यानंतर कुलगुरूनी थेट प्रयोगशाळाना भेटी देत विध्यार्थ्यांशी संवाद साधला.
कॉलेज मध्ये असलेल्या सौर व पवन ऊर्जेचा प्रोजेक्ट, वेगवेगळे विभाग, ग्रंथालय, मैदान, मसाला गार्डन, वर्मी कंपोस्ट पीट, इं्कुबाशन सेंटर, स्पर्धा परीक्षा केंद्र ई ठिकाणी भेटी दिल्या.
महाविदयालययाच्या आर्ट सर्कल च्या विधार्थी मानाच्या पुरुषोत्तम करंडकाच्या फायनल पोहीचल्या बद्दल शुभेच्छा दिल्या.
आरं बी आई चे आर्थिक साक्षरता केंद्र मान्यतेबद्दल अभिनंदन केले व यामुळे बँक व कॉलेज यांचा चांगला समन्वय साधला जाईल असे ते म्हणाले.
पूर्ण दोन तासाच्या भेटीमध्ये त्यांनी कॉलेजचे भविष्यातील घडामोडीचा आढावा घेतला. कॉलेज जवळ ज्या रीसेर्च इन्स्टिटयूट आहेत त्या बरोबर टाय अप साठी कौतुक केले. विद्यापीठच्या नवीन योजना महाविद्यालयात कशा राबविता येतील या बद्दल प्राचार्य डॉ संजय खरात यांच्याशी चर्चा केली.
कॉलेजच्या सर्व पुरस्कारांसाठी प्राचार्य डॉ संजय खरात यांचे कौतुक करून विद्यापीठ सदैव कॉलेजच्या पाठीशी असेल याची ग्वाही दिली.
प्राचार्य, उपप्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक व विध्यार्थी यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण तयार करून संरांनी सर्वांचा निरोप घेतला.

See also  अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय व्यावसायिक स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण