बाणेर : भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गवासी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त बालेवाडी येथे आर के लक्ष्मण म्युझियम मध्ये भाजपा कोथरूड उत्तर मंडळाच्या वतीने चित्रकार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार चारुहास पंडित, उषा लक्ष्मण, अमोल बालवडकर, पुनीत जोशी, गणेश कळमकर, प्रकाश बालवडकर, लहू बालवडकर, प्रल्हाद सायकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, सचिन पाषाणकर, मोरेश्वर बालवडकर, अस्मिता करंदीकर, मोसमी बकोरे, उमा गाडगीळ, सुभाष भोळ, शिवकुमार सिंग आदी उपस्थित होते.
या स्पर्धेचे निरीक्षक म्हणून आदिती देव, वामन लेले, अस्मिता वेदपाठक, प्रभाकर वसईकर यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे आयोजन नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.
या चित्रकला स्पर्धेमध्ये बाणेर बालेवाडी पाषाण परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संयोजन अस्मिता करंदीकर व मोसमी बकोरे यांनी केले होते.
घर ताज्या बातम्या भाजपा कोथरूड उत्तर मंडलाच्या वतीने स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेचे...