ग्रामीण भागामध्ये अर्थकारण वाढवण्यासाठी दुग्ध प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य’ द्यावं – भगवान पासलकर, चेअरमन कात्रज डेअरी

धनकवडी : लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अत्याधुनिक पशुपालन तंत्रामुळे दुग्ध उत्पादनात वेगाने वाढ होऊ शकते आणि जीवनमान सुधारू शकते. केवळ दूध विक्री करून शेतकऱ्यांना चांगले अर्थार्जन होत नाही. तर याच दुधावर प्रक्रिया करून त्याचे पदार्थ विक्री केले तर आपण जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो, ग्रामीण भागामध्ये अर्थकारण वाढवण्यासाठी दुग्ध प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य’ देणं आवश्यक असल्याचे मत पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन भगवान पासलकर यांनी व्यक्त केले.

गोडवा इन्स्टिट्युट ऑफ फूड टेक्नॉलॉजी च्या पुढाकाराने व महा डेअरी असोशिएशन च्या सहकार्यातून आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या गोडवा डेअरी एक्स्पो प्रदर्शन, चर्चासत्रा व डेअरी क्षेत्रात शिक्षण घेतले ल्या महाराष्ट्रातील दुग्ध तंत्रज्ञांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला, यावेळी पासलकर बोलत होते.


यावेळी गोडवा इन्स्टिट्युट व महा डेअरी असोशिएशन च्या वतीने दुध प्रक्रिया उद्योगात अहोरात्र काम करीत असलेल्या व डेअरी क्षेत्रात भांडवल गुंतवुन अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणारे डेअरी उद्योजकांचा डेअरी रत्न, डेअरी क्षेत्रातील उच्चपदस्थ, दुग्ध तंत्रज्ञ, इंजिनिअर्स कर्मचारी यांचा डेअरी भुषण, डेअरी क्षेत्रात बहुमोल योगदान दिलेल्या जेष्ठांचा व दुग्धतंत्रज्ञ यांचा जीवन गौरव सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर, कुतवळ फूडस् चे प्रकाश कुतवळ, रीयल डेअरी इंडस्ट्रीज चे मनोज तुपे, गोडवा इन्स्टिट्युट ऑफ फूड टेक्नॉलाजीचे सीईओ राजेंद्र काटोळे, महाडेअरी असोसिएशनचे अध्यक्ष शहाजी शिंदे, उपाध्यक्ष चेतन दडगे, या मान्यवरां च्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुरस्कार – सेवावृत्ती आदर्श पत्रकारिता पुरस्कार पत्रकार पांडुरंग मरगजे, जीवन गौरव पुरस्कार – अरुण नरगुंदे, प्रसाद कुलकर्णी, अनंत सुमंत,  महा डेअरी उद्योग भूषण पुरस्कार- अल्ताफ शेख, अमोल कापडणीस, भूषण घाडगे, अमोल पाठक,रणजित शिंदे व अमित शिंदे. डेअरी भूषण पुरस्कार – अनिल दवले,महेश जाधव, नामदेव गोपाळे,सतिश मारकंडे, अनिल चौधरी, प्रविण औटी,विजय मुळे, संतोष शिंनगारे,

तीन दिवस सुरू असलेल्या या राष्ट्रीय प्रदर्शनात डेअरी उद्योगातील विविध प्रकारच्या डेअरी उपकरणे मशीनरी, डेअरी फार्मिंग क्षेत्रातील मशिनरी उद्योजक, दूध व्यावसायिक, खाजगी व सहकारी दूध प्रकल्प यांच्या सह शंभर हून अधिक स्टॉल्स् बुकींग झाले होते तर देशभरा तील डेअरी क्षेत्रातील मान्यवर पाहुणे, दुग्ध व्यावसायिक शेतकरी, विविध दूध संघाचे पदाधिकारी व दुग्ध तंत्रज्ज्ञ, दुघ डेअरी उभारणीचे नियोजन करणारे युवक व सर्व सामान्य पाच हजार हून अधिक नागरिकांनी भेट दिली.

See also  देहू, आळंदी मिळून नवीन महानगरपालिका करण्याबाबत चाचपणी - उपमुख्यमंत्री