बाणेर : जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित फॅमिली रन 3.0 ही मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष मा. शरद पवार साहेब यांच्या हस्ते या मॅरॅथॉनचे उद्घाटन करण्यात आले.
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, म्हाळुंगे आणि परिसरातील सर्व वयोगटातील तब्बल 3000 पेक्षा जास्त नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला.
यावेळी जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन तर्फे सर्व सहभगी स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र, टी शर्ट देण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना खा. शरद पवार साहेब म्हणाले, ‘जयेश एक तरुण कार्यकर्ता आहे. बाणेर बालेवाडी आणि परिसरात तो चांगले काम करत आहे आणि कमी वयात चांगली उभारी घेत आहे’.
यावेळी लोकांनी या मॅरेथॉन स्पर्धेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष आणि या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजक जयेश मुरकुटे यांनी आपल्या मनोगतात ‘साहेबांकडे बघून माझ्यासारख्या तरुण कार्य करत त्याला एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते’ असे गौरवोद्गार काढले. ‘साहेबांना 23 वर्षाचा एक कार्यकर्ता एकच विनंती करत आहे की पाठीशी हात ठेवा आणि फक्त लढ म्हणा’ असेही ते पुढे म्हणाले.
यावेळी खा. शरद पवार साहेबांच्या हस्ते वसुंधरा अभियान या संस्थेचा सत्कार करण्यात आला. तसेच कुस्तीपटू विराज रणवडे, इस्रोचे शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेले अजय भुजबळ यांचेही विशेष सत्कार करण्यात आले.
यावेळी राज्यसभेच्या माजी खा. वंदनाताई चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप, अशोक मुरकुटे, रंजनाताई मुरकुटे, संजय मुरकुटे, प्रमिला मुरकुटे, स्वप्निल दादा दुधाने, गिरीश गुरुनानी, संदीप बालवडकर, योगेश सुतार, दत्तात्रय तापकीर, राजेश विधाते, अमर लोंढे, नवनाथ मुरकुटे, राम मुरकुटे, राजेंद्र मुरकुटे, संजय महादेव मुरकुटे, शहाजी मुरकुटे, जयसिंह मुरकुटे, प्रकाश बालवडकर, प्रल्हाद मुरकुटे, गणपतराव बालवडकर, योगेश मुरकुटे, अर्जुन शिंदे, रितेश पडाळे, ऍड. माशाळकर, पद्माकर राऊत, अमेय जगताप, नवचैतन्य हास्य क्लबचे सदस्य, वसुंधरा अभियान चे सदस्य, तसेच बाणेर गावाचे समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.