बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे चंद्रकांत दादा पाटील यांचे अभिनंदन

बालेवाडी  : मा.चंद्रकांतदादा पाटील यांना महाराष्ट्र सरकार मध्ये उच्च तंत्र शिक्षण आणि संसदीय कामकाज खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. यासाठी त्यांचे अभिनंदन बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे आज करण्यात आले.


दादांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने बाणेर बालेवाडी भागातील विविध कामे मार्गी लागतील असा विश्वास बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे व्यक्त करण्यात आला. अपूर्ण रस्ते, पाणीपुरवठा प्रश्न, बालेवाडीत पेट्रोल पंप, ट्रॅफिक जॅम इत्यादी समस्यांवर उपाय योजना यासाठी मा.चंद्रकांत दादांचे सहकार्य मिळेल अशी आशा आहे. दादांनी सर्व समस्यांवर मदत करण्याचे आश्वासन दिले.
बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे अशोक नवाल, परशुराम तारे, डी.डी. सिंग, मोरेश्वर बालवडकर, वैभव आढाव, शकिल सलाती, रमेश रोकडे व इतर सदस्य या प्रसंगी हजर होते.

See also  महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन