बाणेर येथिल योगीराज नागरी पतसंस्थेच्या दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न

बाणेर : बाणेर येथिल योगीराज नागरी पतसंस्थेच्या दिनदर्शिका २०२५ चा प्रकाशन  राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी योगीराज नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, भाजपा महाराष्ट्र राज्य ओबीसी सरचिटणीस प्रल्हाद सायकर, चिटणीस लहू बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, वैशाली कमाजदार उपस्थित होते.

यावेळी नामदार चंद्रकांत पाटील म्हणाले, योगीराज पतसंस्था ही सभासदांना सोबत घेऊन विविध उपक्रमातून नागरिकांची सेवा करण्यासाठी अग्रेसर राहिलेली नामांकित सहकारी संस्था आहे. नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या योगीराज पतसंस्थेच्या दिनदर्शिका प्रकाशन झाले असे मी जाहीर करतो.

माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर म्हणाले, योगीराज पतसंस्था नेहमीच सर्वांना सोबत घेऊन चालत असते. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील नागरिकांना आवडेल आणि दैनंदिन उपयोगात येईल अशी दिनदर्शिका आम्ही तयार केली असून त्याचे उद्घाटन नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते करता आले हि आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.

See also  पंतप्रधान मोदींसाठी मोहोळांच्या संकल्पकनेतून साकारली खास ‘दिग्विजय पगडी’