खडकी : आंतर जिल्हा घरफोडीचे गुन्हे करणा-या अट्टल ०३ आरोपींना खड़की पोलीसांनी २४ तासात जेरबंद करत चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपीनकडुन हस्तगत केला.
सचिन भैय्यालाल हटवार, रा. टाईप ३, अयप्पा मंदिरा शेजारी, रेंजहिल्स, खडकी यांनीत्यांचे राहते घराचे दि. २९/०/२०२४ रोजी घराचे कड़ी कोयंडा तोडुन आतमध्ये प्रवेश करुन २,७०,०००/ – कि.चे. सोन्याचे दागिने व ३,५००/- रु रोख रक्कम चोरी झाली होती. याबाबत खड़की पोलीस स्टेशन गुन्हा रजिनं. ७९/ २०२४
भा.द.वि.कलम. ४५४, ३८० दि.२२/०२/२०२४ रोजी गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्ह्याचे मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस स्टेशन तपासपथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक आण्णा गुंजाळ, पो.हवा. उध्दव कलंदर, पो.ना. संदेश निकाळजे, पो.अंम. अतुल
इंगळे, प्रताप केदारी.,. ऋषिकेश दिघे असे सदर घटनास्थळ परिसरातील सी. सी. टी.व्ही. फूजेट तपासणी करुन प्राप्त सी.सी. टी. व्ही. फूटेज प्राप्त करुन तसेच गोपनिय बातामीदारामार्फत बातमी काढली तसेच पो.अंम. ऋषिकेश दिघे यांना त्यांचे खास बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, सदर घरफोडी करणारे
आरोपी हे तालुका कराड, जि. सातारा येथे चोरी केलेल्या माल विक्री करीता घेवुन गेले असले बाबत माहीती मिळाल्याने कराड जिल्हा सातारा येथे खड़की पोलीस ठाणेकडील तपासपथक स्टाफ
सदर ठिकाणी जातुन बातमी प्रमाणे खात्री करुन आरोपीचा माग काढुन कराड येथुन आरोपी १) अनिल संजय बुद्देवार, वय २८ वर्षे, रा. बर्गे वस्ती, चिंबळी गांव, तात्या बगळे यांचे इमारतीमध्ये
रुमनंबर ७, चाकण पुणे, २) रोशन अरविंद सोनावले, वय २६ वर्षे, रा. सदर, ३) संदिप हरी इंगळे, वय ३६ वर्ष, रा. सदर यांना ताब्यात घेवुन दाखल गुन्ह्याबाबत तपास केला असता त्यांनी सदर गुन्हद्याची कबुली देवुन चोरीचा मुद्देमाल इसम नामे, दत्तात्रय भीमराव पवार,वय ४३ वर्षे, रा. कपिल गोलेश्वर पंचायत टाकीजवळ, तालुका कराड़, जि. सातारा याचेकडे दिलेबाबत सांगितल्याने सदर इसमांचा शोध घेवुन त्यास देखील ताब्यात घेवुन त्याचेकडुन चोरीस गेले मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेली असुन गुन्हद्यात वापरलेली चारचाकी वाहन महिंद्रा स्कार्पीयो क़्. एम.एच. ५० ए ४४४५ तसेच अटो रिक्षा क्र.एम.एच. १४ एच.एम. ७८६२ ही जप्त करण्यात आलेली आहे.
सदर आरोपीकड्न गुन्ह्यातील चोरीस गेले रु. १,७०,००० / – रु. सोन्याचे दागिने व गुन्ह्यत वापरेलेले १०,००,००০/- रु. चे चार चाकी स्कापीयो तसेच १,००,०००/- रु. कि.चे. अॅटो रिक्षा क्र.
एम.एच. १४ एच.एम. ७८६२ असे एकुण १२,७०,०০०/ – रु.कि.चा मृदमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपीताना गुन्द्माचे पुढील अधिक तपासकामी अटक करण्यात आलेली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक आण्णा गुंजाळ हे करीत आहेत. अटक केलेल्या आरोपीतांपैकी , रोशन अरविंद सोनावलेयांचेवर यापुर्वी पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, मुंबई असे विविध ठिकाणी १५ पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. प्रविण पवार, सह पोलीस आयुक्त , पुणे शहर, मा. मनोजकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त , पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री.विक्रांत देशमुख,
पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ०४, पुणे शहर, मा. आरती बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त,खड़की विभाग, पूणे शहर श्री. गिरीशकुमार दिघावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. उत्तम भजनावळे,पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक आण्णा कगुंजाळ, पोलीस उपनिरीक्षक तानाजी कांबळे, पो.हवा. उध्दव कलंदर, पो.ना. संदेश निकाळजे, पो. अंम. अतुल इंगळे, प्रताप केदारी, ऋषिकेश दिघे अनिकेत भोसले, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी केलेली आहे.