गडकिल्ले सेल तर्फे  मंत्री अदिती तटकरेंचा सत्कार

पुणे – महायुतीचा महाविजय व मंत्रीपद प्राप्त झालेल्या अदिती तटकरे श्रीमंत दगडूशेठ गणेशाच्या दर्शनासाठी आल्या असता त्यांचा सत्कार  महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेलतर्फे करण्यात आला.

महायुतीचे सर्व उमेदवार विक्रमी मतांनी निवडून यावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेलच्या  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाने दिलेली प्रचाराची जबाबदारी समर्थपणे पार पाडतानाच रायरेश्वरी शंभू महादेवाला महाविजयाचे साकडे घातले होते.  याच पार्श्वभुमीवर विक्रमी मतांनी निवडून येवून मंत्रीपदं मिळवलेल्या  मंत्र्यांचा सत्कार  संकल्प केला होता. पुणे येथे श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या मंत्रीमहोदया अदिती तटकरे यांचे गडकिल्ले संवर्धन सेल तर्फे उस्फुर्त स्वागत करण्यात आले. महिला व बालविकास हे महत्वाचे मंत्रीपद मिळाल्याबद्दल  महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार यांनी मंत्री महोदयांचा शाल व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार केला.


यावेळी  सेलचे पदाधिकारी समीर धुमाळ, शंकर चिकणे, अविनाश जाधव, युवराज मुजुमले, महेंद्र देवघरे, जयदीप भापकर, विक्रम भिलारे, कुणाल शेलार, केतन पासलकर उपस्थित होते.

See also  सुस भगवती नगर, शेख कॉलेज परिसरात अज्ञात व्यक्तीकडून पत्रके वाटल्याने एकच खळबळ ; एक मोठी व्यक्ती पैसे उकळत असल्याचा केला आरोप