दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पुणे शहर काँग्रेस जिल्हा कमिटीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

पुणे : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दु:खद निधन झाले, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. 
यावेळी अनेक नेत्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू विषयी माहिती सांगितली.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे हे श्रध्दांजली व्‍यक्त करताना म्हणाले की, ‘‘डॉ. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक उदारीकरण आणि हक्कांवर आधारित कल्याणकारी धोरणांमुळे कोट्यावधी भारतीयांचे जीवन आमूलाग्र बदलले, भारतात एक मोठा मध्यमवर्ग निर्माण केला आणि कोट्यवधी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली. त्यांनी नागरिकांसाठी अन्नाचा कायदेशिर अधिकार, शिक्षणाचा अधिकार, काम करण्याचा अधिकार आणि माहितीचा अधिकार ही बिले समंत करून क्रांती निर्माण केली आणि या क्रांतीमुळे भारतीय राजकारणाचे नवे पर्व निर्माण झाले. लाखो लोकांचे जीवनमान उंचावत २०१४ पर्यंत त्यांनी जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्‍यवस्था स्विकारली तेव्‍हा भारत दहाव्‍या स्थानावर होता. डॉ. सिंग याच्या भारताच्या कल्पनेचा केंद्रबिंदू म्हणजे केवळ उच्च वाढच नव्‍हे तर सर्वसमावेशक वाढ आणि सर्व बोटींना उभारी देणारी भरती हा विश्वास होता. अतिशय प्रामाणिकपणे व सचोटीने काम करणारे नेते म्हणजे डॉ. मनमोहन सिंग. आज भारताने एक दूरदर्शी राजकारणी, निर्विवाद सचोटीचा नेता आणि अतुलनीय उंचीचा अर्थशास्त्रज्ञ गमवला.’’


यांनतर माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे आदींनी श्रध्दांजलीपर भाषणे केली.यानंतर सर्वांनी २ मिनीटे स्तब्ध उभे राहून डॉ. मनमोहन सिंग यांना श्रध्दांजली वाहिली.

यावेळी ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी आमदार रविंद्र धंगेकर, प्रदेश सरचिटणीस वीरेंद्र किराड, गोपाळ तिवारी, नगरसेवक अविनाश बागवे, अजित दरेकर, रफिक शेख, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, बाळासाहेब अमराळे, मेहबुब नदाफ, सदानंद शेट्टी, मुख्तार शेख, नितीन परतानी, सोमेश्वर बालगुडे, राज अंबिके, विनोद रणपिसे, द. स. पोळेकर, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, सेवादलाचे प्रकाश पवार, भरत सुराणा, रमेश सकट, आसिफ शेख, रमेश सोनकांबळे, हेमंत राजभोज, संदिप मोकटे, शाम काळे, दिपक ओव्‍हाळ, अविनाश अडसुळ, चेतन पडवळ, सीमा महाडिक, प्राची दुधाने, अनुसया गायकवाड, ज्योती परदेशी, सुंदर ओव्‍हाळ,  अनिल पवार, मनोहर गाडेकर, सचिन सावंत, अमित कांबळे, नरसिंह अंदोली, राजेंद्र पेशने, सुरेश नांगरे, राहुल वंजारी, भारत इंगुले, चंद्रकांत नार्वेकर आदींसह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते.

See also  पूरग्रस्तांना ५ हजाराची मदत नको भरीव रक्कम द्या वाटप त्वरीत व्हावे - माजी आमदार मोहन जोशी