औंध येथे ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्यांच्या उपस्थितीत नववर्षाच्या शुभेच्छा कार्यक्रम

औंध : औंध परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघातील ज्येष्ठांचा नवं वर्षांचा शुभेच्छां कार्यक्रम माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांनी आयोजित केला होता.

यावेळी डॉ.आर. टी वझरकर, डॉ.प्रभाकर उलंगवार, आत्माराम जाधव,सुरेखा कुलकर्णी, मुरलीधर मुलूक, बबनराव कुंभार, निवृत्ती कलापुरे, योगेश जुनवणे, गोविंद मेहता, सुरसिग भोईटे, गोकुळ गायकवाड आदी उपस्थित होते. सर्व उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना नवीन वर्षांचे कालनिर्णय कॅलेंडर, गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते .सूत्रसंचालन आत्माराम जाधव यांनी केले तर  आभार  डॉ. प्रभाकर उलंगवार यांनी मानले.

See also  पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी बांबू लागवडीस प्राधान्य द्यावे- प्रधान सचिव प्रविण दराडे