राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी तुषार कामठे

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील माजी नगरसेवक तुषार कामठे यांची पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.
पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी भाजपा पक्षामधून राष्ट्रवादी पक्षामध्ये तुषार कामठे यांनी प्रवेश केला होता.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सत्ताधारी पक्षात असताना देखील महानगरपालिकेच्या अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणल्यामुळे ते सातत्याने चर्चेत राहिले.

पिंपरी चिंचवड शहराला आश्वासक तरुण चेहरा मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी करण्यात त्यांचा प्रभाव राहणार आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत तुषार कामठे यांना पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदाची सूत्रे सोपवण्यात आली.

See also  पदाधिकाऱ्यांना तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी लावून घरोघरी संपर्काच्या सूचना