पुणे : महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्या शुभहस्ते मा. आयुक्त कार्यालय मीटिंग हॉल चौथा मजला येथे आज दुपारी बारा वाजता पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025, प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.
पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग यांचेकडील दिनांक 16 जुलै 2025 रोजीचे आदेशातील मार्गदर्शक तत्वानुसार तसेच दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी पालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता तयार करण्यात आलेली प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
त्यानुसार 41 प्रभागांमध्ये एकूण मतदार 35 लाख 51 हजार 469 आहेत.प्रारूप मतदार यादीवर दिनांक नोव्हेंबर 20 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये हरकती व सूचना दाखल करून घेण्यात येणार आहेत.
प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभाग घेणार अंतिम मतदार यादी दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
मतदाराने घ्यावयाच्या हरकतींचे प्रकार-
१. स्वतः मतदाराने केलेले अर्ज – ज्या मतदाराचे नाव चुकीच्या प्रभागात समाविष्ट झालेले असेल त्यांनी नमुना हरकत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे
2. इतर मतदाराने एक किंवा अनेक विशिष्ट मतदाराबाबत घेतलेले हरकत- ज्या तक्रारदारास अन्य मतदाराबाबत हरकत घ्यायची आहे त्यांनी नमुना ब मध्ये मतदाराचे तपशील, त्याचे रहिवासाचे पुरावे तसेच यादी भाग क्रमांकाची प्रत जोडून अर्ज करणे आवश्यक आहे.
– एकच सहकारी गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या एकापेक्षा अधिक मतदारांचे नमुना मधील अर्ज त्या संस्थेच्या अध्यक्ष किंवा सचिव यांच्यामार्फत त्या संस्थेच्या लेटरहेडवर संबंधित सचिव किंवा अध्यक्षाच्या स्वाक्षरीने एकत्रितपणे सादर करता येतील.
– कोणत्याही परिस्थितीत एक गठ्ठा पद्धतीने किंवा एकत्रित यादीच्या स्वरूपात हरकती दाखल करता येणार नाहीत व असे अर्ज विचारात घेणे आवश्यक असणार नाही.

























