पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्या अध्यक्षेतखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवारी (दि.२९) आयोजित बैठकीत ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी व पडताळणी प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली.
यावेळी उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, मनोज खैरनार, अनिल पवार, रेवणनाथ लबडे, स्वप्नील मोरे, यशवंत माने, निवडणूक शाखा तहसीलदार राहूल सारंग तसेच मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार व प्रतिनिधी उपस्थित होते.
श्रीमती कळसकर म्हणाल्या, जिल्ह्यात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी व पडताळणीच्या अनुषंगाने एकूण ११ अर्ज संबंधितांकडून प्राप्त झाले होते, त्यापैकी एका उमेदवारांने अर्ज माघारी घेतला आहे. तसेच ७ अर्जाच्या अनुषंगाने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे उर्वरित ३ अर्जावर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट तपासणी व पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. न्यायालयीन याचिकेबाबत आदेश प्राप्त झाल्यास त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही श्रीमती कळसकर म्हणाल्या.
यावेळी उमेदवार व प्रतिनिधींच्यावतीने बैठकीत विविध सूचना करण्यात आल्या.
घर ताज्या बातम्या जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी व पडताळणी प्रक्रियेबाबत बैठक संपन्न