धंगेकर, मग एकनाथ शिंदेंवर कारवाईची मागणी करणार का?भाजप नेते पुष्कर तुळजापूरकरांचा सवाल

पुणे : अशोक खरात प्रकरणावरून शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर आता भाजप नेते पुष्कर तुळजापूरकर यांनी धंगेकरांना थेट सवाल केला आहे.

रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या घटनेचा संदर्भ देत धंगेकर आठ महिन्यांनी जागे झाले का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, अशोक खरातसोबत उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे फोटो समोर आले असताना त्यांच्यावर कारवाईची मागणी धंगेकर करणार का? असा सवालही तुळजापूरकर यांनी केला आहे.

पुष्कर तुळजापूरकर म्हणाले की, रूपाली चाकणकर यांनी २० मार्च २०२६ रोजी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी त्या घटनेचा संदर्भ देत धंगेकर दादांवर कारवाईची मागणी करत आहेत. मग एवढे दिवस धंगेकर कुठे होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुढे त्यांनी धंगेकरांना उद्देशून म्हटले की, आता तुम्ही जागे झालाच आहात, तर अशोक खरात यांच्यासोबतचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंबाबत काय भूमिका घेणार? शिंदे यांच्यावर कारवाईची मागणी कोणाकडे करणार, हेही स्पष्ट करा.विशेष म्हणजे, पुष्कर तुळजापूरकर यांनी यावेळी एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांचे काही फोटोही सादर केले आहेत.

See also  शनिवारवाड्याच्या पुनःरूज्जीवन करण्याची राज्यसभेत खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांची मागणी