महात्मा गांधीचे विचार आजही देशाच्या कणाकणात जिवंत आहेत – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग नाना चव्हाण पाटील

पुणे  : बंदुकीच्या गोळीने माणसं मारता येऊ शकतात, पण सत्य कधीही संपविता येऊ शकत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्यांनी १९४८ साली त्यांची हत्या केली. पण, महात्मा गांधीचे विचार आजही देशाच्या कणाकणात जिवंत आहेत. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग नाना चव्हाण पाटील यांनी केले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त धायरीत खडकवासला काँग्रेसतर्फे अभिवादन करण्यात आले. चव्हाण पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी उपस्थित माननीय श्रीकृष्ण बराटे सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, किसान काँग्रेस अध्यक्ष विजय बापू लगड, खडकवासला काँगेस वरिष्ठ उपाध्यक्ष संजय अभंग, हवेली तालुका पर्यावरण विभाग अध्यक्ष बाळासाहेब प्रताप, VJNT हवेली तालुकाध्यक्ष सचिन सुर्वे, खडकवासला उपाध्यक्ष विश्वजीत जाधव आदी उपस्थित होते.

See also  महापालिकेच्या शाळांचे खासगीकरण थांबवा! – आम आदमी पार्टीचा तीव्र निषेध